दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
एक रुपया सहभाग असल्याने गतवर्षी खारीक हंगामात पिक विमा योजनेत विक्रमी ५.१२ लाख शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभला. यासाठी पिक विमा कंपनीकडे ३८२.३४ कोटीचा हप्ता जमा करण्यात आला. हंगामात
सर्वच पिकाचे नुकसान झाले. त्या तुलनेत कंपनी द्वारा फक्त ४८.७७ कोटीचा परतावा बाधित शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. त्यामुळे बाधित शेतकरी वाऱ्यावर अन कंपनीचे चित्र आहे. राज्य शासनाने मोठा गाजावाजा करेल एक रुपयात पिक विमा योजनेत शेतकरी सहभागी चे घोषणा केली. त्यामुळे गतवर्षीच्या खरीप हंगामात या योजनेला उच्चांकी ५.१० शेतकऱ्यांचा सहभाग लाभला. त्यातच जुलै ते अगस्ट दरम्यान११ महसूल मंडळात पावसाचा २० ते २५ दिवस खंड देखील राहिला होता. त्यापूर्वी जुलै मधील अतिवृष्टीनेही पिकाचे मोठे नुकसान झाले. शिवाय सोयाबीन काढणीच्या काळातही अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या सर्व आपत्तीसाठी बाधित १.१२ लाखावर शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे तक्रारी नोंदवल्या होत्या. यातील बहुतेक शाळा तक्रारी कंपनीद्वारे तांत्रिकीकरणाचा आधार घेत फेटाळून लावले आहेत. त्यामुळे पिक विमा कंपनीवर नियंत्रण कोणाचे असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभावे, यासाठी शेतकरी पिक विमा सहभाग घेतात., मात्र, एकदा शेतकरी सहभाग लाभल्यानंतर त्या शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडले जात असल्याचा अनुभव शेतकरी घेत आहे. पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारले आहे. कृषी विभागाने वारंवार पत्र दिले,एफ आय आर करण्याची तंबी दिली, त्यानंतर हे फारसा फरक पडण्याची दिसत नाही. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पावसाअभावी बाधित४१ महसूल मंडळासाठी काढलेले अधिसूचना पिक विमा कंपनीद्वारे ग्राह्य न धरता त्यावर अपील केले होते. विभागीय आयुक्त सह राज्याच्या कृषी सचिवांनी पिक विमा कंपनीचे आक्षेप भेटायला चांगलेच फटका आले होते. केंद्र शासनाकडे अपील केल्यानंतर कंपनीचे आक्षेप ग्राह्य धरण्यात आले होते. नैसर्गिक आपत्ती ३७.५० कोटी. प्रतिकूल हवामान-९.३८ कोटी, काढणी पश्चात नुकसान-२.८३ कोटी, आतापर्यंत परतावा-४८.७७ कोटी, शेतकरी सहभागी हिस्सा-५.१० लाख, राज्य शासन हिस्सा-२२४.६० कोटी, केंद्र शासन हिस्सा-१५७.६९ कोटी एकूण प्रीमियम जमा ३८२.३४ कोटी, अचलपूर तालुक्यात २०.४६ कोटीचा प्रीमियम२ कोटी, अमरावती२९.७८ कोटी(३.१९) कोटी, अंजनगाव-२७.५२(१०.५७ कोटी) भातकुली २९.९१ कोटी (३.९८ कोटी) चांदुर रेल्वे २५.९१ कोटी (३.१२ कोटी) चांदूरबाजार २४.१७ कोटी (२.९० कोटी) चिखलदरा १०.६२ कोटी (३० लाख), दर्यापूर ४६.७७ कोटी (२.१४ कोटी), धामणगाव रेल्वे ३२.०३ कोटी (२.०२ कोटी) धारणी १७.८२ कोटी (१.८१ कुटी,), मोर्शी ३०.५८ कोटी (४.९९ कोटी), नांदगाव खंडेश्वर ४४.७५ कोटी (१०.९१ कोटी), तिवसा२४.९७ कोटी (८४ लाख) व वरुड १७.३६ कोटी प्रीमियम जमा, ९४ लाखांची भरपाई देण्यात आली. पिक विमा कंपनीने अपात्र ठरविलेल्या पूर्व सूचना, यासह शेतकऱ्यांच्या तक्रारी या अनुषंगाने १७ मे रोजी बैठक बोलावली आहे. पिक विमा भरपाई साठी कंपनीकडे पाठपुरावा करण्यात येत आहे असे आमच्या प्रतिनिधींना राहुल सातपुते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी माहिती दिली
अमरावती जिल्ह्यातील बाधित शेतकरी वाऱ्यावर; प्रधानमंत्री पिक विमा योजना कंपनीचे कोटीची भरपाई
