‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

yuvarashadmin

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी लगावला आहे. राज ठाकरेंनी शनिवारी कणकवलीमध्ये केंद्रीय मंत्री तसेच सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे महायुतीचे उमेदवार नारायण राणेंसाठी घेतलेल्या सभेनंतर राऊत यांनी ही टीका केली आहे. बाकं बडवणारे खासदार हवेत की मोदींच्या मंत्रीमंडळात काम करणारे? या राज ठाकरेंच्या प्रश्नावरुन संजय राऊतांनी त्यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका करताना राज ठाकरेंनी कोकणातील सर्व माजी खासदारांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे

राज ठाकरेंचा मोदी-शाहांचे नवे भक्त असा उल्लेख

“सध्या हे जे नवीन मोदी-शाहांचे भक्त झालेले आहेत. ते खरोखर महाराष्ट्राचे सुपूत्र आहेत का हे त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. त्यांनी काल कोणकणातील अनेक नेत्यांचा अपमान केला. तुम्हाला बाकं बडवणारे खासदार पाहिजेत. अजित पवार पण सुप्रिया सुळेंबद्दल हेच बोलतात. तुम्हाला बाकं बडवणारे खासदार हवेत की मोदींच्या मंत्रीमंडळात जाऊन काम करणारे खासदार हवेत?” याचा अर्थ काय? असा प्रश्न राऊत यांनी विचारला. 

ही बाकं बडवणाऱ्यांची ताकद आहे

बाकं पडवणारा खासदार या वक्तवायवरुन संजय राऊतांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. राज ठाकरेंनी कोकणातील खासदारांचा अपमान केल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. बाकं बडवणाऱ्या खासदारांनी देश वाचवला, असं राऊत म्हणाले. “बाकं बडवणारा खासदार म्हणजे काय? मंत्रीमंडळात गेले नाहीत म्हणजे बाकं बडवणं आहे का? हा त्यांनी बॅरिस्टर नाथ पै, जे कोकणातले अत्यंत नामवंत खासदार होते, त्यांचा अपमान केला आहे. पंडित नेहरु त्यांचं भाषण ऐकायला थांबायचे. मधू दंडवते, मधू लिमये असतील, असे अनेक लोक खासदार झाले. त्यांनी आपल्या भागांचे प्रश्न मांडले ते फक्त बाकं बडवणारे खासदार होते का? मुळचटगिरी करुन, दहा पक्षांतर करुन मंत्रीपद भोगणं हा विकास? बाकं बडवणाऱ्या खासदारांनी देश वाचवला आहे. त्यांनी लोकशाही वाचवली आहे. बाकं बडवणाऱ्या 140 खासदारांना निलंबित केलं आहे हे माहिती आहे का? बाकं बडवून मोदींना लोकशाही संदर्भात सवाल विचारणाऱ्या 140 खासदारांना मोदी-शाहांना निलंबित केलं. ही बाकं बडवणाऱ्यांची ताकद आहे. बॅरिस्टर नाथ पै हे कोकणातून वारंवार निवडून येत होते. पंडित नेहरुंच्या, इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील सरकारला आपल्या भाषणांनी घाम फोडत होते,” असं राऊत म्हणाले.

नक्की वाचा >> राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

राज ठाकरेंनी वेळ काढून…

“हे जे मौनी खासदारांचं समर्थन करत आहेत मनसे प्रमुख, ही त्यांची मजबूरी आहे. बॅरिस्टर नाथ पै असतील, मधू दंडवते असतील सुधीर सावंत सुद्धा चांगल्याप्रकारे लोकसभेमध्ये काम करत होते. जरी बाकं बडवत असतील त्यांनी वारंवार घेतलेल्या भूमिका महत्त्वाच्या आहेत. वेळ काढून थोडा अभ्यास केला, आत्मचिंतन केलं तर अनेक गोष्टी समजतात. पण ते नकली अंधभक्त होत आहेत. ते खरे भक्त नाहीत. पुढे त्यांची भक्ती, देव बदलू शकतात. त्यामुळे त्यांना हे समजणार नाही,” असा टोला राऊत यांनी लगावला. 

Source

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a comment
scroll to top